App Fraud : मोबाईल फोनमधून तात्काळ डिलीट करा 'हे' App, अन्यथा बँक अकाउंट होईल रिकामं; सरकारकडून अलर्ट जारी..

 



ऑनलाइन कर्ज देणाऱ्या अॅप्सबाबत सावध राहण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. अशाच एका अॅपला तात्काळ मोबाईल फोनमधून डिलीट करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.



ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अनेकदा सायबर तज्ज्ञही चक्रावून जातात. सायबर चोरांकडून सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी विविध कल्पना लढवतात. मोबाईल अॅपच्या (Mobile App) माध्यमातून अनेकदा फसवणूक होत असल्याचे समोर आले आहेत. ऑनलाइन कर्ज (Loan App) देणाऱ्या अॅप्सबाबत सावध राहण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. 

सायबर दोस्त हँडलवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये हनीफॉल लोन अॅप हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हनीफॉल अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. आतापर्यंत सुमारे 10 हजार लोकांनी ते डाउनलोड केले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हे अॅप तुमच्या फोनवर डाऊनलोड केले असेल तर ते त्वरित डिलीट करावे.
 

बँक फ्रॉडसाठी अॅप कारणीभूत?

सायबर दोस्त हे एक ऑनलाइन पोर्टल आहे, जे वेळोवेळी सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत अलर्ट देत असते. हे पोर्टल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. 'सायबर दोस्त'च्या पोस्टनुसार, हनीफॉल अॅप  एका खास कोडसह डिझाइन केले गेले आहे. जेव्हा एखादा युजर फोनवर हनीफॉल डाउनलोड करतो, तेव्हा मॅलेशियल कोडच्या मदतीने हॅकर्स फोनचा ताबा घेतात. यानंतर तुमच्या फोन डेटाच्या मदतीने बँक फसवणुकीच्या घटना घडू शकतात.



 


झटपट कर्ज देणाऱ्यांपासून सावध रहा

आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सरकारने झटपट कर्ज देणारे अॅप टाळण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत. यापूर्वी सायबर दोस्तकडून विंडमिल मनी आणि रॅपिड रुपी प्रो बाबत अलर्ट जारी करण्यात आला होता. झटपट कर्ज देण्याच्या नावाखाली अॅप्स फसवणूक आणि खंडणीखोरी वाढली असल्याचे काही सायबर संस्थांच्या अहवालात दावा करण्यात आला होता. 


अश्या  प्रकारे धोका होऊ शकतो 


मनी लाँड्रिंग, डेटा चोरी, करचोरी, सीमाशुल्क उल्लंघन, खंडणी आणि फसवणूक - ही काही कारणे आहेत ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोमवारी सुमारे 138 सट्टेबाजी आणि 94 कर्ज अॅप ब्लॉक केले , 


अनेक राज्यांमध्ये, मायक्रो-फायनान्सिंग अॅप्सवर कर्जदारांचा रिकव्हरी एजंटांकडून छळ केल्याचा, त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे .


काही छोट्या फिनटेक कंपन्यांच्या बाबतीत, असा आरोप करण्यात आला आहे की त्यांनी उच्च व्याजदराने अल्पमुदतीचे कर्ज देऊन हजारो लोकांना "फसवणूक" केली आणि नंतर मोबाईल फोन अॅप्सद्वारे मिळवलेला  वैयक्तिक डेटा वापरून त्यांना मारहाण केली.


👉🏻 अश्याच नवनवीन माहितीसाठी तसेच नवनवीन योजना , शेतीविषयक माहिती🌽, सरकारी योजनांबद्दल माहिती🏘️, घरघुती माहिती , मोबाईल App📱 , व इतर खूप काही माहितीसाठी 📡खालील गृप मध्ये सामील व्हा..!

👇🏻

https://chat.whatsapp.com

WhatsApp ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा...

                              https://chat.whatsapp.com




 

No comments:

Post a Comment

Digitally signed 7 12, 8A, फेरफार, मालमत्ता पत्रक Online पहा | digitalsatbara.mahabhumi.gov.in

  Digital Satbara महाभूमी पोर्टलवरून आपण   डिजिटल स्वाक्षरी केलेले 7 12(digitally signed 7 12) 8a e ferfar Utara आणि प्रॉपर्टी कार्ड/मालमत्त...